पंतप्रधानांच मौन ट्रोलर्सना प्रोत्साहन देतं – अनुराग

मुंबई – चित्रपट सृष्टीतील कलाकार मनमोकळेपणाने आपले राजकीय विचार, सामाजिक त्याचप्रमाणे व्यक्तिगत आयुष्यातील विचार सोशल माध्यमांवर जाहीर करतांना दिसतात. अनेकदा सिनेकलाकारांना सोशल माध्यमांवर ट्रोल केल्याच्या घटना सुद्धा समोर येतात. अशातच काही दिवसांपूर्वी ट्रोलरने  सर्व मर्यादा लांघत अनुरागच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली आहे. यावर ‘पंतप्रधानांच मौन ट्रोलर्सना प्रोत्साहन देतं.’ असे मत अनुरागने  मांडले आहे. या ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, अनुरागने पंतप्रधान मोदींना ट्विटमध्ये टॅग केले होते.

या संपूर्ण प्रकरणाबाबत एक नामांकित वृत्तवाहिने अनुरागला पंतप्रधान मोदींना ट्विटमध्ये टॅग का केले, असा प्रश्न विचारला असता अनुराग म्हणाला की,’मी केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांना टॅग करायचे कारण म्हणजे सरकारनं ट्रोलिंगविरोधात गंभीरपणे आणि कठोर होऊन आपली भूमिका मांडली पाहिजे. अर्वाच भाषेत बोलणाऱ्या किंवा अशा धमक्या देणाऱ्या ट्रोलर्सना शोधून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ट्रोलिंग विरोधात कायदा अस्तित्वात आला, त्याचं पालनं झालं तर या गोष्टी सहज बंद होतील. त्यासाठी मग सरकारला काही वेगळं करण्याची गरज पडणार नाही. परंतु, ट्रोलिंगविषयी पंतप्रधान कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं या ट्रोलर्सना अधिकाधिक प्रोत्साहन मिळत आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.