“प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश’ सप्ताह राबविणार : डॉ. विखे

नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाबरोबरच प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून संपन्न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतला आहे. त्यानुसार राज्यातही विविध सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करून समाज घटकांपर्यत पोहचण्याचा निर्णय भाजपाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक गावांत दिव्यांगाना साहित्याची मदत, वृक्षारोपण रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियानातून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश, रुग्णांना फळे वाटप तसेच प्लाझ्मा दान करण्याचे उपक्रम कार्यकर्त्यानी आयोजित करावेत, असे आवाहन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.