शिक्रापूर -करंदी (ता. शिरूर) येथे शेत नांगरले म्हणून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भाऊसाहेब बाजीराव ढोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपट बाजीराव ढोकले, साधना पोपट ढोकले, अनिकेत पोपट ढोकले, सुरज पोपट ढोकले यांच्या विरुद्ध तर पोपट बाजीराव ढोकले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भाऊसाहेब बाजीराव ढोकले, कल्पना भाऊसाहेब ढोकले, वैभव भाऊसाहेब ढोकले, सौरभ भाऊसाहेब ढोकले, पांडुरंग बाळासाहेब कारले (सर्व रा. करंदी, ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे करत आहे.