सोनई, (वार्ताहर)- संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर येथील स्व. ओम मोरे या 20 वर्षाच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून बलिदान दिले. आपल्या आईला शेवटचा मोबाईलवर संदेश पाठवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केली.
या घटनेमुळे सकल मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे. स्व.ओम मोरे या तरुणाच्या घरच्यांना तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळावी, यासाठी नेवासा येथे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार बिरादर व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल ताके,नेवासा तालुकाध्यक्ष भरत बेल्हेकर,उपाध्यक्ष बद्रीभाऊ चिंधे, प्रसिद्धी प्रमुख संदीप दरंदले,महिला तालुकाध्यक्षा नीलिमा वाबळे, नेवासा शहरप्रमुख जयश्री शिंदे, उपाध्यक्ष उज्ज्वला गवळी,संपर्क प्रमुख लीलाताई मारकळी,शहरसंघटक उषाताई मारकळी, अशोक वाबळे, दिलीप शिंदे उपस्थित होते.