पुणे : आर एम डी फाउंडेशन द्वारा मदनबाई माणिकचंद धारीवाल रुग्णालय शिरूर येथे अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड सर्जरी शिबिर नुकतेच संपन्न झाले. त्याप्रसंगी आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर.धारीवाल यांनी आपले मत व्यक्त केले.
महाराष्ट्र व राज्याबाहेरून जळालेले रुग्ण, जन्मता असलेले हाताचे पायाचे व शरीरावरील व्यंग ,जुळलेले वाकडी कमी जास्त बोटे ,मस व चेहऱ्यावरील वाकडे व्रण, दुभंगलेले ओठ व टाळू वाकडे नाक, कान हनुवटीचा आकारात बदल व अपघाताने आलेले व्यंग ईत्यादी प्रकारातील रुग्ण दरवर्षी या शिबिरामध्ये येतात व मोफत सर्जरीचा फायदा घेतात मागील बारा वर्षापासून हे शिबिर नियमितपणे राबवण्यात येत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
शनिवार दिनांक 7 व रविवार दिनांक 8 असे दोन दिवशीय कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते . एकूण २५० रुग्णांची तपासणी करून ७६ रुग्णांची यशस्वी सर्जरी करण्यात आली . यावेळी मागील १० वर्षांपूर्वी एका सहा महिन्याच्या मुलीचे २४ बोटं चिकटलेली होती तेंव्हा पासून तिचे उपचार चालू होते व या शिबिरामध्ये शेवटचे राहिलेले बोट यशस्वीरित्या वेगळे केल्या गेले आता ती पूर्णपणे बोटांची हालचाल करू शकते याबाबत तिने डॉक्टर चमूचे व रुग्णालयाचे उपकार कधीच विसरू शकणार नाही अशी भावना व्यक्त केली.
शिबिर यशस्वी होण्यासाठी अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्टचे श्री उमेश जालन , डॉ. पंकज जिंदल प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, डॉ .सुब्रह्मण्यम ,डॉ. स्वप्ना आठवले प्लास्टिक सर्जन यांनी तसेच मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयाचे डॉ . प्रशांत केदारी बालरोग विशेषज्ञ ,डॉ . रवींद्र चौहान ऑर्थोपेडिक सर्जन , डॉ .गुप्ता , डॉ . अरविंद जैन , वंदना सागवेकर ,आयसीयू स्टाफ, नर्स यांनी प्रयत्न केले .