Pitru Paksha 2023: पितृ पक्ष हा पूर्वजांना समर्पित आहे. या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. पंचांगानुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला समाप्त होतो. पितृपक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षाच्या काळात पितरांचे श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवून आणि श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या काळात, श्राद्ध केवळ पितरांच्या मोक्षासाठीच नाही तर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी देखील केले जाते. पितृपक्षात पितरांना श्रद्धेने जल अर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, गावकऱ्यांना जेवण जेऊ घालण्याचीही पद्धत प्रचलित आहे. अशा परिस्थितीत तर्पण पद्धत, नियम, घटक आणि मंत्र जाणून घेऊया…
पितृ पक्ष 2023 कधी सुरू होत आहे?
यावर्षी 29 सप्टेंबर 2023 पासून पितृ पक्ष सुरू होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
तिथी / श्राद्ध तिथी
29 सप्टेंबर 2023 शुक्रवार पौर्णिमा श्राद्ध
29 सप्टेंबर 2023 शुक्रवार प्रतिपदा श्राद्ध
30 सप्टेंबर 2023 शनिवार द्वितीया श्राद्ध
01 ऑक्टोबर 2023 रविवार तृतीया श्राद्ध
०२ ऑक्टोबर २०२३ सोमवार चतुर्थी श्राद्ध
03 ऑक्टोबर 2023 मंगळवार पंचमी श्राद्ध
04 ऑक्टोबर 2023 बुधवार षष्ठी श्राद्ध
05 ऑक्टोबर 2023 गुरुवार सप्तमी श्राद्ध
06 ऑक्टोबर 2023 शुक्रवार अष्टमी श्राद्ध
07 ऑक्टोबर 2023 शनिवार नवमी श्राद्ध
08 ऑक्टोबर 2023 रविवार दशमी श्राद्ध
09 ऑक्टोबर 2023 सोमवार एकादशी श्राद्ध
11 ऑक्टोबर 2023 बुधवार द्वादशी श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023 गुरुवार त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023 शुक्रवार चतुर्दशी श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023 शनिवार, सर्व पितृ अमावस्या
पितृ पक्षातील तर्पण पद्धत
पितृ पक्षाच्या काळात पितरांना दररोज नैवेद्य दाखवावा. तर्पणसाठी कुश, अक्षत, जव आणि काळे तीळ वापरावेत. तर्पण अर्पण केल्यावर, पितरांना प्रार्थना करा आणि आपल्या चुकांसाठी क्षमा मागावी, असे सांगितले जाते.
पितृपक्ष प्रार्थना मंत्र
1- पितृभ्य:स्वधायिभ्य:स्वधा नम:।
पितामहेभ्य:स्वधायिभ्य:स्वधा नम:।
प्रपितामहेभ्य:स्वधायिभ्य:स्वधा नम:।
सर्व पितृभ्यो श्र्द्ध्या नमो नम:।।
2- ॐ नमो व :पितरो रसाय नमो व:
पितर: शोषाय नमो व:
पितरो जीवाय नमो व:
पीतर: स्वधायै नमो व:
पितर: पितरो नमो वो
गृहान्न: पितरो दत्त:सत्तो व:।।
पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्यांनी ही खबरदारी घ्यावी –
पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध करणार्यांनी या काळात केस आणि दाढी कापू नयेत. तसेच या दिवसांमध्ये घरी फक्त सात्विक अन्न तयार करावे. तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे, असेही सांगितले जाते.
पितृ पक्षाचे महत्त्व –
असे सांगितले जाते की, पितृलोकामध्ये तीन पिढ्यांचे आत्मा राहतात. पितृलोक हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील स्थान मानले जाते. या क्षेत्रावर मृत्यूचा देव यम राज्य करतो, जो मृत व्यक्तीच्या आत्म्याला पृथ्वीवरून पितृलोकापर्यंत घेऊन जातो. अशा स्थितीत पितृपक्षात श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष मिळतो आणि स्वर्गात जातो, असे पैराणिक कथांनुसार सांगितले जाते.