पिंपरी -आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मंगळवारी (दि. 5) सायंकाळी 6 वाजता आकुर्डी-खंडोबा माळ येथील खंडोबा देवस्थान कार्यालयात होणार आहे.
या मेळाव्यामध्ये काही कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहे. उप-विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष यांचे पद वाटप होणार आहे. शहरामध्ये सध्या मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले आहेत.
मनसेची सध्याची भूमिका “एकला चलो रे’ ची असली तरीही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी काळात त्यामध्ये बदल अपेक्षित आहे. मनसेने सद्य:स्थितीत किमान 70 जागांवर उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या मेळाव्याला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, राज्य उपाध्यक्ष रणजित शिरोळे आदी उपस्थित राहणार आहे.
मनसे व अंगीकृत संघटनेचे सर्व अध्यक्ष, उप-शहराध्यक्ष, सचिव, विभाग अध्यक्ष, संघटक, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांनी पक्ष प्रवेशाची यादी प्रत्येक विधानसभेचे उप-शहराध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.