पिंपरी – भारत श्रीलंका संयुक्त सराव मित्रशक्ती -2023 याचा मंगळवारी (दि.28) औंध येथील सदर्न कमांड फॉरेन ट्रेनिंग नोड येथे समारोप झाला. औंध मिलिटरी स्टेशनचे ब्रिगेडियर एस. तलुजा, कमांडर आणि श्रीलंकन आर्मीचे मेजर जनरल रथनायक यांनी समारोप समारंभात दोन्ही राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांना संबोधित केले. तसेच सरावादरम्यान केलेल्या अतुलनीय कवायती व कार्यपद्धतींचे कौतुक केले.
सैन्यांमधील संयुक्त सराव हा जगभरातील राष्ट्रांमधील लष्करी मुत्सद्देगिरीचा एक पैलू आहे. हे लष्करांमधील संबंध, विश्वास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन बनत आहे जे संयुक्त लष्करी ऑपरेशन्स जसे की संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखण्याच्या ऑपरेशन्स दरम्यान उपयुक्त ठरू शकते.
भारत श्रीलंका संयुक्त सराव (मित्रशक्ती -2023) 16 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. दोन्ही राष्ट्रांच्या तुकडींनी सरावाच्या वेळी संयुक्त कवायतीचा सराव करताना प्रचंड उत्साह आणि व्यावसायिकता दाखवली. सर्व सहभागींसाठी हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या तुकड्यांसह सैन्याने केवळ एकमेकांच्या ऑपरेशनल ड्रिल्स आणि रणनीती जाणून घेतल्या नाहीत, तर संयुक्त राष्ट्र संघाच्या आदेशानुसार उप-पारंपारिक ऑपरेशन्सच्या अंमलबजावणीमध्ये पाळल्या जाणार्या विचारांची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाणही केली आहे.
या सरावाने सहभागी लष्कराच्या जवानांना शांततेच्या समर्थनार्थ संयुक्त कारवाई करण्याबाबत महत्वाचा धडा शिकविला आहे. या सरावादरम्यान दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी इन्डोस्कोपी कॅमर्याचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. सरावाच्या दरम्यान तुकड्यांमध्ये निर्माण झालेली सौहार्द नक्कीच अशा ऑपरेशन्ससाठी एकत्रितपणे तैनात केलेल्या सैन्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यात मदत करेल. या लष्करी सरावाचे आयोजन हे शांतता, समृद्धी, आंतरराष्ट्रीय बंधुता आणि विश्वास या मूल्यांचे समर्थन करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे जे या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाशी सुसंगत आहे.