पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर झाली आहेत. २६ मे रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते सकाळी ११ वा मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात याचे वितरण होणार आहे. याविषयी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.
विशेष ग्रंथकार पुरस्कारार्थी – डॉ. शैलजा बापट, मनोहर जाधव, हिमांशु कुलकर्णी, अतुल पेठे, तमन्ना इनामदार, आनंद माडगूळकर, जवाहर मुथा, ज्ञानदा नाईक, प्रभाकर ओव्हाळ, पत्रकार पराग करंदीकर, पत्रकार संजय आवटे, सुधीर गाडगीळ, संतोष काळे, सुनील विभुते, संजय सोनवणी, सुभाष कवडे, वर्षा गजेंद्रगडकर. वार्षिक ग्रंथ पारितोषिकप्राप्त लेखक – रमेश चव्हाण, दीपक घारे, विक्रम भागवत, देवा झिंजाड, समीर गायकवाड, स्नेहा अवसरीकर, करुणा गोखले
डॉ. केशव देशमुख, पंकज भोसले, डॉ. गजानन शेपाळ, नेहा भांडारकर, पी. विठ्ठल, रजिया सुलताना, उज्ज्वला बर्वे, डॉ. प्रमोद पाठक, डॉ. श्रीधर पवार, डॉ. विनायक गंधे, संजय आर्वीकर, रविमुकुल संपादक, डॉ. वंदना घांगुर्डे, रमेश ओझा, श्याम पाखरे, विजय जाधव, स्वानंद बेदरकर, दीपाली दातार, दिलीप नाईक निंबाळकर, गौरी रत्नपारखी, प्रसाद तारे, सावित्री जगदाळे, डॉ. सुरेश सावंत, रविबाला काकतकर, विनायक कुलकर्णी, अपूर्वा जोशी, अनिता पाध्ये, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. जयदेव पंचवाघ, क्रांती पैठणकर, डॉ. शांताराम गायकवाड