अखेर घरांच्या बोगस नोंदी रद्द

गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांचे आदेश

कामशेत  -नाणे मावळातील भाजगाव गावठाणातील काही घरांच्या व बखल जागांच्या बोगस नोंदी करून त्यांची विक्री करणायत आली होती. या संदर्भातील मूळ जागा मालकाने मागील वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे तक्रार केल्याने चौकशी अंती या बोगस व खोट्या नोंदी रद्द करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

भाजगाव हे ग्रुप ग्रामपंचायत गोवित्री अंतर्गत येत आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी 2005 साली मिळकत क्रमांक 67 व 68 या गावठाणातील बखळ जागेची ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेऊन इतर लोकांच्या नावाच्या बोगस नोंदी केल्या होत्या. तसेच मिळकत क्रमांक 70 व 78 यांच्या 2007 साली ग्रामपंचायत मासिक ठराव घेऊन इतर लोकांच्या नावाच्या बोगस नोंदी केल्या होत्या.

तर सदर बखल जागांच्या नोंदी पैकी मिळकत क्रमांक 67 व 71 मध्ये घरे बांधून त्यांच्या देखील चुकीच्या नोंदी केल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भातील जागेच्या मूळ मालकाने त्याला माहिती मिळाल्यानंतर जानेवारी 2020 रोजी आपल्या मालमत्तेवर चुकीच्या नोंदी झाल्या असून, त्या पूर्ववत करून देण्याची मागणी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार संबंधित नोंदींची चौकशी केल्यावर त्या नोंदी बेकायदेशीर आढळल्याने मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी नोंदी रद्द करण्याचे आदेश ग्रामसेवकास दिले होते.

त्यानुसार ग्रामसेवकांनी बेकायदेशीर नोंदी रद्द देखील केल्या आहेत. मात्र मूळ जागा मालकांची नावे अध्यापही त्यांच्या मालमत्ता पत्रकावर आलेली नाहीत व बोगस नोंदी करणारे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर देखील आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने तक्रारदार चिंताग्रस्त झाले आहेत.

आमच्या जागेवर बोगस नोंदी करणाऱ्या तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व दोषी असणाऱ्या इतर सदस्यांवर त्वरित कारवाई करावी. आमच्या घरांच्या व बखल जागांच्या नोंदी पूर्ववत करण्यात याव्यात.
– सचिन गरुड,तक्रारदार, मूळ जमीन मालक

भाजगाव येथील बेकायदेशीर नोंदी संदर्भात चौकशी करून तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांची नावे जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत.
– सुधीर भागवत,गटविकास अधिकारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.