पिंपरी – ड्रायव्हर्स डेनिमित्त उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पीएमपीच्या ड्रायव्हर सेवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विना अपघात सेवा देणाऱ्या १५ ड्रायव्हर सेवकांचा व १५ डेपोतून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १५ ड्रायव्हर सेवकांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांचे हस्ते व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. विना अपघात सेवा देणाऱ्या १५ ड्रायव्हर सेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या वेळी डॉ. संजय कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.
तर, नितीन नार्वेकर म्हणाले की, वाहतूक कोंडीतून सुरक्षितपणे बस चालवून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचे महत्वाचे काम पीएमपीचे ड्रायव्हर सेवक करतात. पीएमपीच्या ड्रायव्हर व कंडक्टर सेवकांवरच पीएमपीची प्रतिमा अवलंबून असते. सेवकांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच पीएमपीच्या नावलौकिकात भर पडत असते.