पिंपरी – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंगला सुरूवात झाली आहे. मंगळवारी (दि.3) मुंबई पक्ष कार्यालयात पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचे चिरंजीव सागर तापकीर, राहुल पवार, संतोष शिंदे आदींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, जाकिर मुलानी, जमीलोद्दीन शेख, कुलदीप बोराटे, आशिष जगधने, गौरव मानमोडे, हर्षद परमार, आशिष मोरवडकर, प्रसाद जाधव, विठ्ठल कबाडे, सुजित डांगे, अमोल भारती, सचिन शिंदे, हाजी मलंग शेख, सागर रेड्डी आदी उपस्थित होते.
शरद पवार यांच्या शिव-शाहू- फुले-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्या कार्यकर्त्यांवर इथून पुढे कधीही अन्याय होणार नाही. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील ताकदीच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीत युवकांना 50 टक्के तिकिटांची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती इम्रान शेख यांनी दिली.