पिंपरी – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व तळेगाव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय (एनएमआयईटी, एनसीईआर) मधील अंतिम वर्षातील 1,718 विध्यार्थ्यांसाठी आतापर्यंत 2,170 नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात विविध कंपनी प्रतिनिधींनी मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांना 3.5 लाख रुपये ते 61 लाख रूपयांपेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या नोकऱ्यांची संधी दिली आहे.
याठिकाणी घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यात चालू वर्षी नामांकित कॅपजेमिनी (547), कॉग्निझंट (229), क्सेंचर (149) या नामांकित कंपनीत मास रिक्रुटमेंट करण्यात आली. तसेच रोजगाराच्या संधी दिलेल्या काही आय. टी. प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये डेटा इनसाईट (36 लाख), बीएनवाय मेलॉन (18.64 लाख), द्रुवा सॉफ्टवेअर (17 लाख), वेरीटास (16 लाख) यांचा समावेश आहे. त्याच बरोबर रोजगाराच्या संधी दिलेल्या काही कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपन्या यामधे मर्सिडीज बेंझ, डसॉल्ट सिस्टिम्स, व्हर्लपूल, एटलस कॉपको, गोदरेज, मिंडा, अल्फा लावल यांचाही समावेश आहे.
पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट सेल दर वर्षी विद्यार्थ्यांना सुमारे 350 नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी उपलब्ध करून देते. पीसीईटीचे आतापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज 61 लाख (उबेर) आहे. यावर्षी 584 विद्यार्थ्यांना वार्षिक 7 लाख रुपये पेक्षा अधिक पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. 1057 विद्यार्थ्यांना वार्षिक 5 लाख रुपये ते 7 लाख रुपये; 432 विद्यार्थ्यांना 3.5 लाख रुपये ते 5 लाख रुपये पर्यंत आणि 97 विद्यार्थ्यांना 3.5 लाखापेक्षा कमी वार्षिक पगाराच्या अशा एकूण 2,170 विद्यार्थ्यांना यावर्षी नोकऱ्या मिळाल्या आहेत.