पिंपरी – पिंपरी चिंचवड मधील नाट्यगृहातील भाडे, लाईट बील आशिया खंडात सर्वाधिक घेतले जाते, अशी खंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यसंमेलनाच्या उद्धाटन भाषणात व्यक्त केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आयुक्तांना बोलावून प्रमाणे असणारे कमी दर चालू करण्याची सूचना दिली. मुख्यमंत्र्यांच्या आदरयुक्त तंबीनंतर आयुक्त शेखर सिंह यांनी त्वरीत करत नाट्यगृहाचे भाडे पुर्वीप्रमाणे करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी त्या बाबत परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार उद्धाटन झाले. या निमित्त अनेक कलाकारांची मांदियाळी शहरात पाहायला मिळाली. कार्यक्रमात राजकीय लोकप्रतिनिधींची उपस्िथती पाहून कलाकारांनी आपले गाऱ्हाणे देखील मांडले. पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहात आकारल्या जाणाऱ्या भाड्याचा दर अधिक आहे. तो परवडत नसल्याच्या तक्रारी कलाकार, नाट्य संस्थांनी केल्या होत्या. वाढीव भाडे असल्याने अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. मात्र महापालिका प्रशासन त्या बाबत कोणताच सकारात्मक निर्णय घेत नव्हते. नाट्यसंमेलनात उद्धाटक म्हणून उपस्िथत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर जाहिररित्या ही गोष्ट कलाकारांनी घातली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना बोलवून हे तत्काळ रद्द करण्याची तंबी वजा सूचना दिली. भाषणात देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेची दखल घेत आयुक्त शेखर सिंह यांनी त्वरीत कार्यवाही करत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाडे आकारणी कमी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार पुर्वीप्रमाणे नाटय संस्थाना भाडे शुल्क आकारण्याबाबतचा आदेश आज निर्गमित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, आचार्य अत्रे रंगमंदीर पिंपरी, कै.अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी, नटसम्राट निळु फुले रंगमंदीर पिंपळे गुरव, ग.दि. माडगूळकर नाटयगृह आकुर्डी प्राधिकरण येथे मराठी तसेच इतर कोणत्याही भाषेतील नाटक अथवा मराठी संगीत नाटक अशा स्वरुपाचे सांस्कृतिक क्षेत्रातील विविध कार्यक्रम नाटय संस्था (व्यावसायिक व हौशी नाटक संस्था), प्री स्कुल,शाळा, महाविदयालय, इतर संस्थाकडून वेगवेगळया स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जातात. महापालिकेच्या या सर्व ५ नाटयगृहाचे व्यावसायिक व हौशी नाटक संस्थाकडून आकारावयाच्या भाडे आकारणी बाबत महापालिकेने निर्गमित केलेले १० जानेवारी २०२३, ३० जुन २०२३ चा आदेश तसेच ३१ जुलै २०२३ चा आदेशए ६ जानेवारी २०२४ पासून निरस्त करण्यात आला आहे.