पिंपरी – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास नाईकवाडी यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात प्रथमच छकडी शर्यत (बैलगाडा) स्पर्धा आयोजित करण्यात आली. चाकण येथील बैलगाडा घाटावर “महान भारतकेसरी’ शर्यत उत्साहात पार पडली. कात्रज येथील निसर्ग गार्डनच्या सुंदर आणि हरण्या जोडीने मानाचा महान भारतकेसरी किताब पटकावला आणि थार गाडी मिळवली.
तब्बल 600 छकडी बैलगाडा आणि सुमारे 70 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडल्या. या स्पर्धेसाठी मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश आदी राज्यांमधून गाडामालक सहभागी झाले. थार गाडी, टेम्पो, ट्रॅक्टर, 70 दुचाकी अशा भव्य बक्षीसांची उधळण यानिमित्ताने करण्यात आली.
विकास नाईकवाडी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू केलेल्या या लढ्याला यश मिळाले. त्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमी आणि शेतकऱ्यांमध्ये आमदार लांडगे यांच्याबाबत आदराची भावना आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक : निसर्ग गार्डन, कात्रज (संदर आणि हारण्या), महालक्ष्मी प्र. विटा (बब्या आणि बावऱ्या), भैरवनाथ प्र. बापुरसाहेब भाडळे वाघोली, उमेश फुरसुंगी (सरपंच आणि 2211 पिस्टन), स्वामी साई सचिन घरत मोहील धुमाळ, सुसगाव (बकासूर आणि सर्जा), जोतिर्लिंग जितेंद्र देशमुख (लेंगरे) (चिक्या आणि वादळ), स्वराज घिगे नाच्या ग्रुप मोशी (बलमा आणि लक्ष्मणराव), श्रावणी दत्ता शिंदे (पाटखळ) (शिवराज आणि राजा), आईगावदेवी प्र. रणवीर राहुलभाई पाटील (आ. कल्याण) (सिकंदर आणि वायर), चेंडू ग्रुप मंगळापूर नेवसा, अमोल ढगे (हारण्या आणि चिमण्या), सचिन चव्हाण, वाई (सिकंदर आणि वायर).
बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्रातील शेतकरी, भूमिपूत्रांचे अतूट नाते आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेसह सर्वच संस्था, संघटना आणि शर्यतप्रेमींनी योगदान दिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लढ्याला मोठे पाठबळ दिले. हा शेतकऱ्यांचा थरारक खेळ टिकला पाहिजे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थचक्र सक्षम होत असल्यामुळे केलेल्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान वाटते.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा,