पिंपरी – ऑल इंडिया सिलंबम फेडरेशन व तामिळनाडू स्टेट सिलंबम असोसिएशनने सेंट जोसेफ सायन्स कॉलेज कडलूर, तामिळनाडू येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट असोसिएशनच्या 45 खेळाडूंनी सहभाग घेत 2 सुवर्ण, 24 रौप्य व 13 कांस्यपदकांची कमाई केली.
या स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा ठसा उमटवला. महाराष्ट्र संघामधून राज्य संघटनेचे सचिव किरण अडागळे, खजिनदार स्मिता धिवार, प्रशिक्षक सुदर्शन सूर्यवंशी, रविराज चखाले, चंद्रपूर जिल्ह्यामधून दुर्गराज रामटेके, मुंबई जिल्हा प्रदीप ओव्हाळ हे संघा उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांची डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजय खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे. मुले ः सुरज बांगर – सुवर्णपदक, सोहम चोळकर, राजवीर परांडेकर, किरण वाळेकर, राज वायकोळे, गणेश चखाले, वेदांत ठोंबरे, संगम नागरगोजे, अभिषेक खताळ, शिवनाथ यादव, पवन कनोजिया, क्रिष्णा सिंग, हर्षद गवारे, सोहम केदार, शिवदत्त सिंग, उज्वल भोसले, क्रिश भोस्कर – रोैप्यपदक, अभिराज नेटके, अर्णव पाटील, वेदांत मेत्रे, स्वराज अडागळे, नैतिक उनेचा, नवाज पठाण, दीक्षांत रामटेके, अथर्व पातसे यश बालगुडे -कांस्यपदक.
मुली – ऐश्वर्या देवेंद्रन – सुवर्णपदक, आराध्या नेटके, तृप्ती यादव, श्रुती शिंदे, प्रगती पालके, ईश्वरी परांडेकर, तनिष्का ठोंबरे, दिव्या गेडाम, तंनु आडे -रौप्यपदक. ऋतुजा कुलकर्णी, आर्या गायकवाड, प्रणिशा देवेंद्रन, शौर्या रामटेके -कांस्यपदक.