पिंपरी – पुण्यातील गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध उत्सव आहे. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी नागरिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून येतात. त्यांच्या सोयीसाठी पिंपरी- चिंचवड संपूर्ण पुणे शहरात पीएमपीने जादा पीएमपी बसचे नियोजन करण्यात आले होता. या दहा दिवसांच्या कालावधीत पीएमपीला 18 कोटी 82 लाख 39 हजार 448 उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात तीन कोटी रुपयांची अधिक भर पडली आहे.
पुण्यातील गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळ विविध देखावे सादर करतात. आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी असते. शहर आणि परिसरातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक हे देखावे पहाण्यासाठी येतात. यंदा पीएमपीने रात्रीच्या वेळी नेहमीपेक्षा 5 रुपये अधिक तिकीट दर ठेवला होता. तसेच जादा बसचे नियोजन केले होते.
पीएमपीने पहिल्या टप्प्यात 168, तर दुसऱ्या टप्प्यात 654 जादा पीएमपी बस सोडल्या होत्या. तसकेच सरासरी 1700 बसमार्फत गणेश भक्तांना तसेच देखावे पहाण्यासाठी येणाऱ्यांना सेवा दिली होती. त्या दहा दिवसांच्या उत्सवकाळात पीएमपीला एकूण 18 कोटी 82 लाख 39 हजार 448 उत्पन्न प्राप्त झाले. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या काळात 15 कोटी 51 लाख रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले होते. तर, यंदा त्यात 3 कोटी 31 लाख रुपयांची वाढ झाली असून पीएमपीला 18 कोटी 82 लाख 39 हजार 448 उत्पन्न मिळाले आहे.