पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड मल्याळी समाजमच्या वतीने आकुर्डी येथे मोफत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या सीएमएस केरला भवन येथे 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन संस्कार भारतीचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रफुल्ल भिष्णुरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर, कालवेदी प्रमुख पी.व्ही. भास्करन, खजिनदार पी. अजयकुमार, उपाध्यक्ष पी. श्रीनिवासनन, प्रविजा विनीत, प्राचार्या डॉ. बीजी गोपकुमार, चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात शिवराम हाके, रवींद्र माळवदे, क्रांती बनकर, रमेश खडबडे, सुमा बाबू, लीना आढाव, रोमा जॉय, माया उगरण, वर्षा भिंगारे आणि सीएमएसच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे पहायला मिळणार आहेत.