अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी हिरोईनने आपल्याकडे “गुडन्यूज’ असल्याचे सांगितले आहे. करीना कपूर, अनुष्का शर्मा आणि अनिता हंसनंदानी पाठोपाठ आता अमृता रावनेही आपल्याकडे “गुडन्यूज’ असल्याचे संकेत दिले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकऊांटवरवरुन बेबी बम्पचा फोटो शेअर केला आहे, यात तिच्यासोबत तिचा पतीसुद्धा दिसतोय. या फोटो शेअर करत अमृताने तिला कितवा महिना सुरु आहे याची माहिती दिलीय.
अमृता रावने या पोस्टमधून फॅन्सपासून प्रेग्नेंन्सीची गोष्ट लपवली याबद्दल माफी मागितली आहे. तुमच्यासाठी हा 10वा महिना आहे पण माझ्यासाठी हा 9वा महिना आहे. माझ्या सर्व चाहत्यांना ही गुडन्यूज सांगून मी खूप उत्साहित आहे.
अमृता रावला आपल्या फॅन्सला सरप्राईज द्यायची सवय आहे. तिने आरजे अनमोलबरोबर लग्न केले होते, तेंव्हाही या लग्नाची घोषणा तिने अशीच अचानक केली होती. अनमोलने 2009 मध्ये अमृताचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर त्यांच्यातील लव्हस्टोरी सुरू झाली होती आणि 2016 मध्ये दोघांनी लग्न केले होते.
View this post on Instagram
DOSE OF POSE 💓 . #pink #doseofpose #posing #posingtips #posingforthecamera 📸 #mysunday #weekendvibes
अमृताने हा अनुभव आपल्यासाठी खूपच आनंददायक असल्याचे तिच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अमृताला या गुडन्यूजचे संकेत मिळाले होते. आता तर घरी नवीन पाहुणा येण्याची वेळ देखील जवळ आली आहे.