‘डीडीएलजे’चे २५ वर्ष पूर्ण

मुंबई –  सिनेसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात अनेक नायक-नायिकांचा ऑनस्क्रिन रोमान्स पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिला. पण त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या जोड्या सुपरहिट झाल्या. यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल ते शाहरुख खान आणि काजोल या जोडगोळीचे.

प्रेमात पडणाऱ्यांसाठी आणि प्रेमात पडलेल्यांसाठी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट अत्यंत खास आहे. आज या लोकप्रिय चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्ष झाले.

राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांच्यातील केमिस्ट्री प्रत्येक प्रेक्षकाला आणि तरुणाईला भावली, त्यामुळे हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला.

“दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’  या सुपरहिट चित्रपटांमधून झळकलेल्या या जोडीला प्रेक्षकांनी शब्दशः डोक्‍यावर घेतले.

या चित्रपटातील  एक गाजलेला सीन म्हणजे रेल्वे स्टेशनवरील शाहरुख आणि काजोलचा ‘पलट सीन’. बाबत  आजही  प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. या चित्रपटातील प्रत्येक संवाद, सीन हे अत्यंत सुंदररित्या सादर करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.