मुंबई – अभिनेत्री ईशा तलवारने ‘मिर्झापूर 2’ मधील आपल्या आकर्षक आणि दमदार अभिनयाने सर्वांचीच मने पेटवली आहे. या अभिनेत्रीच्या निरागसतेने अनेक लोकांनी आपले हृदय गमावले आहेत. ईशा नुकतीच ऋषी कापुर यांच्या ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात दिसून आली होती.
View this post on Instagram
स्टाइल आणि लूक्सच्या बाबतीत ईशा तलवारला कोणी टक्कर देऊ शकत नाही. मिर्झापूर आणि आर्टिकल 15 मधील अभिनयातून ईशा तलवारने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
View this post on Instagram
नुकतंच, ईशाने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसून येत आहे. फॅन्सला तिचा ग्लॅमर्स आणि मादक अवतार खूप आवडला आहे. त्यामुळे ईशाचे चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
View this post on Instagram
पण ही अभिनेत्री रील लाइफमध्ये दिसते तितकी निरागस नाही आणि तिचा सोशल मीडिया अकाऊंट पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. ईशा खूपच हॉट आणि बोल्ड आऊटफिट परिधान करते. ईशा तलवारने मल्याळम, तमीळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे.