नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललाय. कोरोनामुळे लोकांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. त्याच वेळी ज्यांच्या घरात सगळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यावर अधिक आर्थिक संकट ओढवले आहे.
अशा परिस्थितीत आपले पीएफ खाते आपल्याला मदत करू शकते. तसेच संकटाच्या वेळी आपणास फायदेशीर ठरू शकते. आपण कोरोनावरील उपचारांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढणार असल्यास त्वरीत आपला क्लेम निकाली निघेल, ज्यासाठी आपल्याला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. शिवाय हे पैसे परत भरण्याचीही आवश्यकता असणार नाही.
गेल्या वर्षीच सरकारने कोविड केअर अर्थात कोरोनाच्या उपचारासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली होती. कोविड केअरचा समावेश पीएफ विड्रावलच्या यादीमध्ये केला होता. यानंतर पीएफ खातेदार त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. आपण आपल्या पीएफ खात्यातून काढलेले पैसे पुन्हा जमा करण्याची आवश्यकता नाही. सरकारने खात्यातून पैसे काढण्याचे नियमही बनविले आहेत, त्या आधारावर हे पैसे काढता येत आहेत.
कोविड केअरच्या काळात पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम काढली जाऊ शकते. अट एवढीच आहे की, हे पैसे आपल्या तीन महिन्यांच्या पगारापेक्षा कमी असले पाहिजेत. नियमांनुसार या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल तितकीच रक्कम काढता येईल.
जर आपला पगार 20 हजार रुपये आहे आणि आपल्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये असल्यास आपण 60 हजारांहून अधिक पैसे काढू शकता. समजा तुमचा पगार 30 हजार रुपये आहे आणि तुमच्या खात्यात 1 लाख रुपये आहेत, तर तुम्ही 75 टक्के म्हणजेच 75 हजार रुपये काढू शकता. म्हणजेच पगाराच्या तुलनेत जे काही कमी असेल आणि 75 टक्के हिस्सा म्हणजे आपण खात्यातून जास्त पैसे काढू शकता.
कोरोना संकटाच्या वेळी जर आपण कोविड केअरच्या नावावर पैसे काढले, तर तुम्हाला 3 कामकाजाच्या दिवसात पैसे मिळतील. एकदा तुम्ही पीएफ खात्यात क्लेमसाठी अर्ज केला की, तुमचा चेक बॅंकेत जाईल आणि बॅंक त्याचे पेमेंट लवकरात लवकर करेल. अशा परिस्थितीत आपल्याला सुमारे 3-5 दिवसांत आपले पीएफचे पैसे मिळतात. हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ वेबसाईटवरून क्लेमसाठी अर्ज करावा लागेल. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे आपणास हे पैसे शक्य तितक्या कमी वेळात मिळतील.