Ram Gopal Varma | चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राम गोपाल वर्मा यांनी आंध्र प्रदेशातील पिथापुरम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
SUDDEN DECISION..Am HAPPY to inform that I am CONTESTING from PITHAPURAM 💪💐
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 14, 2024
तेलुगू देसम पार्टी-भारतीय जनता पार्टी-जनसेना पार्टी (JSP) युतीने टॉलिवूड अभिनेता आणि JSP प्रमुख पवन कल्याण यांना पिथापुरम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानंतर राम गोपाल यांनी ही घोषणा केली.
Ram Gopal Varma | काय म्हणाले राम गोपाल
आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आरजीव्हीने ट्विटरवर केली आहे. हा निर्णय आपण अचानक घेतल्याचेही त्यांनी सांगितले. ट्विटरवर याची घोषणा करताना चित्रपट निर्मात्याने लिहिले,’अचानक निर्णय. मला कळविण्यास अतिशय आनंद होत आहे की मी पिथापुरममधून निवडणूक लढवत आहे.’
Ram Gopal Varma | हा वाद चर्चेत आला
राम गोपाल वर्मा यांनी गेल्या वर्षी आंध्र प्रदेशच्या राजकारणावर आधारित ‘व्यूहम’ हा चित्रपट बनवला होता. त्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी चित्रपट निर्मात्याला राज्यातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. हा चित्रपट आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीवर आधारित आहे.
बारमध्ये महिलेवर दारू टाकत डान्स करतानाच व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओमध्ये त्यांनी तरुणीवर दारू टाकताच ती ओरडू लागली. कदाचित त्याला कल्पनाही नसेल की राम गोपाल असे काहीतरी करणार आहे. चौकनवाला पाहून लोक अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत.
Ram Gopal Varma | राम गोपाल वर्मा व्हिडिओ व्हायरल
राम गोपाल वर्माच्या भोवती फिरत असलेला वाद यामुळे तो आणखी ट्रोल होताना दिसतो आहे. सोशल मीडियावर राम गोपाल वर्माचा त्याच्याच डेंजरस चित्रपटातील अभिनेत्रीचे पाय चाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्यावर टीकेचा वर्षाव होतो आहे.
Ram Gopal Varma | भोजपुरी स्टार पवन सिंग यांच्या विरोधात लोकसभा लढण्याची शक्यता
‘राम गोपाल वर्माआधी भोजपुरी स्टार पवन सिंगनेही निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. बुधवारी पवन सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, मी माझा समाज, जनता, जनार्दन आणि आई यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य अपेक्षित आहे. देवी मातेचा जयजयकार करा.’
पवन सिंह निवडणूक लढविण्याबाबत ते पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अभिनेत्याने याला नकार दिला. ते कोठून निवडणूक लढवणार हे अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी ते त्यांच्या घरच्या तान आरा येथून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचाल का ? करिअरविषयी करिश्मा कपूरने केला खुलासा