पेठ (वार्ताहर ) – आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आज दि. 30 ते दि 12 जून पर्यंत पेठ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावातील सर्वबाजूच्या सीमा बंद करून मेडिकल व दवाखाने वगळता बँका, पतसंस्था ,बाजारपेठ, व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
पेठ गाव हे आंबेगाव तालुक्याचे पुणे बाजूने प्रवेशद्वार आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेठ गाव पुढील 14 दिवस कडक बंद पाळणार आहे.येथील 2 रुग्ण पती पत्नी हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या घरातील लोकांनां कॉरटाईन करण्यात आले आहे.
गावातील लोकांना गॅस सिलेंडर गरजेप्रमाणे घरपोच दिले जाणार आहेत.ज्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्या कुटुंबातील इतरांना ग्रामपंचायत घरपोच गरजेच्या वस्तू, भाजीपाला, गॅस पुरवणार आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये.बँका व पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.असे पोलीस कैलास कड यांनी सांगितले. गावात घरोघरी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका प्रत्येक दिवसी कुटुंब सर्वेक्षण काम सुरू केले आहे.
गावातील सर्वबाजूच्या रस्त्यावर अडथडे निर्माण करून ग्रामपंचायत ,आरोग्य प्रशासन, महसूल विभाग विशेष दक्षता घेत आहे.