प्रयोगशाळा, संशोधन कक्ष सुरू करण्यास परवानगी

पुणे -उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्थांमध्ये पीएच.डी व पदव्युतर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा अथवा संशोधन कक्ष सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्याबाबतची प्रमाणित कार्यपद्धती तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, असेही तंत्रशिक्षण संस्थांना
निर्देश दिले आहे.

संशोधक विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांना आता प्रयोगशाळा खुली होणार आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, करोना पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत ही मुभा दिल्याचे पुणे विभागीय तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

संस्थेतील प्रयोगशाळा अथवा संशोधन कक्ष सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळा व इन्य वापरासाठीचे क्षेत्रासह सर्व कार्यक्षेत्राची स्वच्छता सोडियम हायपोक्‍लोराइट सोल्युशनसह करावी. विशेषत: वारंवार स्पर्धा केलेल्या पृष्ठभागावर लक्ष देण्यात यावे.
संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ स्पर्शविरहित थर्मोमीटर आणि ऑक्‍झिमीटरद्वारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, संस्थेमध्ये येणारे अभ्यागतांची तपासणी बंधनकारक असेल. संस्थेमध्ये येणारे अभ्यागतांना करोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना संस्थेमध्ये प्रवेश देऊ नयेत.

सर्वांना मास्क परिधान करणे व मास्कचा वापर अनिवार्य राहील. सर्वांसाठी आरोग्य सेतूचा वापर आवश्‍यक करण्यात यावा. सॅनिटायझर अथवा हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असेही कार्यपद्धतीत नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.