भुशी डॅमवर जाण्यास परवानगी

धरण पर्यटनावरील बंदी उठविली

पुणे – जिल्ह्यातील धरण परिसरात पर्यटनासाठी असलेली बंदी जिल्हाधिकारी यांनी उठविली आहे. त्यामुळे भुशी डॅमसह जिल्ह्यातील सर्व धरण परिसरात वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांना जाता येणार आहे.

यामुळे धरण परिसरातील पर्यटनाच्या ठिकाणी असलेले छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांचे आर्थिक चक्र पुन्हा सुरु होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जून महिन्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सर्वच धरण परिसरात पर्यटनास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

आता, मिशन बिगीन अगेन बाबत शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी धरण परिसरात पर्यटनावर घातलेली बंदी उठविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.