नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अयोध्येत नवनिर्मित महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर अयोध्या धाम विमानतळाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामच्या उद्घाटनावेळी जेव्हा विमानाने विमानतळावरून उड्डाण केले तेव्हा विमानात उपस्थित लोकांनी हनुमान चालीसाचे पठण केले, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विमानात उपस्थित असलेले लोक हनुमान चालिसाचे पठण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पीएम मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदींनी आज अयोध्येला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. त्यांनी मिथिला ते रामनगरी दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय त्यांनी अयोध्येत नवनिर्मित महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे उद्घाटन केले.
#WATCH | People recite ‘Hanuman Chalisa’ onboard the inaugural flight to the newly constructed Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham, in Ayodhya, UP pic.twitter.com/7H5UP666XK
— ANI (@ANI) December 30, 2023
याशिवाय पीएम मोदींनी अयोध्या रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आणि वंदे भारत ट्रेन सुरू केली. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी चौथ्यांदा अयोध्येत पोहोचले आहेत.
लोकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, एकेकाळी राम लल्ला तंबूत बसले होते आणि आज त्यांचे घर बनले आहे. राम लल्लाला घर मिळण्यासोबतच देशातील चार कोटी गरीबांनाही घरे मिळत आहेत.
ते म्हणाले की, ३० डिसेंबर ही तारीख भारतीय इतिहासात खूप ऐतिहासिक आहे. १९४३ मध्ये या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.