Rajasthan Cabinet Expansion – राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. 15 डिसेंबर रोजी भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री आणि दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
20 आमदार घेणार शपथ –
या मंत्रिमंडळ विस्तारात 20 हून अधिक मंत्री शपथ घेत आहेत. राजभवनात दुपारी 3.15 वाजता शपथविधीला सुरुवात झाली.
शपथविधी सोहळ्याचे अपडेट्स –
– झोराराम कुमावत यांनी नववे मंत्री म्हणून शपथ घेतली. ते सुमेरपूर मतदारसंघातून आमदार निवडून आले आहेत.
– मदन दिलावर, जोगाराम पटेल आणि सुरेश सिंह रावत यांनीही शनिवारी राजस्थानचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. उदयपूरच्या झाडोल मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले बाबू लाल खराडी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Rajasthan Cabinet expansion: BJP MLA Rajyavardhan Rathore takes oath as a cabinet minister pic.twitter.com/U4LhyiuD06
— ANI (@ANI) December 30, 2023
-गजेंद्र सिंह खिंवसार, बाबूलाल खराडी, मदन दिलावर यांनाही मंत्रिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या, त्यांनी राजस्थान कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
-भाजपचे आमदार राज्यवर्धन राठोड यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
Rajasthan Cabinet expansion: BJP MLA Dr Kirodi Lal Meena takes oath as cabinet minister pic.twitter.com/nqxM0pjV6S
— ANI (@ANI) December 30, 2023
– भाजपचे आमदार डॉ. किरोरीलाल मीना यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
#WATCH | On cabinet expansion today, Rajasthan BJP leader Rajendra Rathore says, “The cabinet will represent all sections and will be able to fulfil the aspirations of the people of Rajasthan…” pic.twitter.com/dqeukrrm4G
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 30, 2023
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजस्थानचे भाजप नेते राजेंद्र राठोड म्हणाले, “सर्व विभागांचे प्रतिनिधित्व करणारे मंत्रिमंडळ असेल आणि ते राजस्थानच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम असेल.”
सर्व मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी थोड्याच वेळात..