सातारा: शेखर गोरेंच्या विजयासाठी जनतेचा उठाव

गावागावात कार्यकर्त्यांची फळी; विरोधकांना शह देण्याच्या हालचाली

सातारा, दि. 18 : माण मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या उमेदवारीनंतर आता त्यांच्या विजयासाठी या मतदारसंघातून जनतेचा उठाव झाल्याचे दिसून येत आहे. शेखर गोरे यांची युवकांच्यात असलेली के्रझ, अन् गावागावात त्यांनी केलेली स्वखर्चातून कामे त्यांची जमेची बाजू असल्याने गावागावात कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाल्याने त्यांच्या विजयाची औपचारीकताच बाकी असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

मतदानाला केवळ काही तास उरले असताना या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. तिरंगी होत असलेल्या या मतदारसंघातील लढतीत माजी आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, शेखर गोरे या तगड्या उमेदवारांच्यात मोठी लढत होत असल्याने हा मतदारसंघ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

यात प्रथमपासून जयकुमार गोरे, व प्रभाकर देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांनी फोडाफोडीच्या हालचालींच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अंतर्गत पोखरणी करून विरोधकांना मोठा धक्का देण्याची तयारी केली.

त्याला शेवटच्या टप्प्यात मोठे यश येताना दिसत आहे. अनेक गावात शेखर गोर यांची एक टीम कार्यरत असून गावागावातील संवाद साधण्याचे काम मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. त्यावेळी सर्वसामान्य मतदारही शेखर गोरे यांचा विजय करून माण मतदारसंघातील हुकूमशाही व साहेबी थाटाला कायमचा बंदोबस्त करू असा विश्वास व्यक्त करत आहे.

या मतदारसंघातील माण तालुक्यातील अनेक संघटनाही शेखर गोरे यांच्याशी संधान बांधून आहेत तर खटाव तालुक्यातील गावागावात त्यांच्या विजयासाठी झटणारी कार्यकर्त्यांची फळी काम करताना दिसत आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दहिवडीत होणारी सभा ढगाळ वातावरणामुळे हेलीकॉप्ट न अल्याने रद्द झाली. मात्र, विरोधक याबाबतीत अफवा पसरवण्याचे पाप करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला कधीही यश तर येणारच नाही पण त्यामुळे शेखरभाऊंच्या विजयाची वाट अधिक सोपी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)