नवी दिल्ली : जाधवपूर विद्यापीठाचा जागतिक नावलौकीक असल्याने त्याला प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा द्यावा, असे आवाहन प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी झेड दर्जाची सुरक्षा मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी केले.
न्यायलयीमन बैठकीसाठ मिी जाधवपूर विद्यापीठात आलो होतो. जाधवपूर विद्यापीठाला जागतिक नावलौकीक आहे. त्यामुळे प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा मिळवण्यास ही संस्था पात्र आहे, असे मी न्यायलयाला सयचवले, असे धनखर म्हणाले.
धनखर यांना त्यांच्या जीवीताला असणारा धोका लक्षात घेऊन गुरूवारी झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. त्यांना भारतात सर्वत्र केंद्रीय राखीव पोलिस दलाची सुरक्षा देण्यात येणार आहे.