मुंबई – मराठी रसिक प्रेक्षकांवर मोहिनी घालाणाऱ्या अनेक मालिका सध्या पुन्हा नवं रूप धारण करताना दिसत आहेत. 10 वर्षांपूर्वी स्टाप प्रवाह वाहिनीवर ‘अग्निहोत्र’ ही मालिका गाजली होती. प्रेक्षकांनी अक्षऱश या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना डोक्यावर उचलून घेतल होतं. आता तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘अग्निहोत्र २’ मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दरम्यान, यामध्ये महादेव अग्निहोत्रींची भूमिका पाहायला मिळतेय. ही भूमिका अभिनेते शरद पोंक्षे साकारत आहेत. २५ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या सगळ्याच गोष्टी या मालिके निमित्त जुळून आल्या आहे.