आयर्लंड येथील श्रीमान सेवा योगी या संस्थेने कार्तिकी एकादशी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये विठ्ठल पूजा आणि वारकरी भजन हा कार्यक्रम डॉक्टर संगीता तोडमल आणि निलेश इंगुळकर यांनी केंटकी अमेरिका तिथून ऑनलाइन सादरीकरण केला.
या निमित्ताने आपल्या वारकरी संप्रदायाची आणि पंढरपूर वारीची संकल्पना दिली एकूणच पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची असेल तर अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉक्टर संगीता तोडमल या पर्यावरण अभ्यासापासून सामाजिक सांस्कृतिक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा अमेरिकेत जपत आहेत याचा निश्चितच भावी पिढीसाठी आदर्श ठरेल त्यांनी आतापर्यंत विविध जयंत्या-पुण्यतिथ्या यांचे कार्यक्रम साजरे केले आहेत.
संगीता तोडमल यांनी अमेरिकेतआपल्या परसबागेत सुमारे 50 हून अधिक वेगवेगळ्या फळभाज्या फुलबाज्या पालेभाज्या वेलवर्गीय भाज्या लावून त्यावर विविध प्रयोग केले आहेत. आणि तेही सेंद्रिय पद्धतीत तसेच घनकचरा व्यवस्थापन सेंद्रिय खत तेही त्या स्वतः करतात. अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्थांबरोबर त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण विषयक चळवळ सुरू केलेली आहे.
वरील भाग पालेभाज्या फळभाज्या किंवा टेरेस गार्डन परसबाग आशा विविध विषयांवर महिला बचत गट हाउसिंग सोसायटी यामध्ये त्या अनेक वर्ष मोफत मार्गदर्शन करतात, तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळे शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ही त्या ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या विषयात मार्गदर्शन करतात करोना काळातही त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करून एक अनोखा उपक्रम केला.
भारताबरोबरच त्या वेगवेगळ्या पर्यावरण विषयक चर्चासत्रात सहभागी होतात त्यांनी जगभरातील अनेक देशातील पर्यावरण विषयक प्रश्नांवर अभ्यास केलेला आहे. तसेच या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही शाळा कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था यामध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने देऊन पर्यावरण संवर्धनाची एक पिढी घडवत आहेत.
तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती याचे अमेरिकेत पालन करत आहेत. आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच विविध सण उत्सवात सहभाग घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
श्रीमान सेवा योगी या संस्थेमार्फत विविध सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रम केले जाते या संस्थेचे सुमारे जगभरातील अकरा देशात सभासद आहेत त्यामुळे कार्तिकी वारी सेलिब्रेशन प्रोग्राम आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आला यावेळी विजय एडगे आयर्लंड यांनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केले, या कार्यक्रमात पखवाद वादक निलेश इंगुळकर साथ-संगत यांनी केल.