PBKS vs DC : टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या.यानंतर दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पंजाब किंग्ज मैदानात उतरले. मात्र एकापाठोपाठ विकेट्स गेल्याने पंजाबला शेवटच्या ओव्हरपर्यंत विजयाची प्रतीक्षा करावी लागली.
शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. त्यानंतर मात्र इशांत शर्माने पंजाबला एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के दिले. | PBKS vs DC
इशांतच्या षटकात पंजाबला दोन धक्के
पंजाब किंग्जला चौथ्या षटकात 34 धावांवर पहिला धक्का बसला. डावाच्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. धवनने 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. | PBKS vs DC
यानंतर, पाचव्या चेंडूवर, प्रभासिमरनने सरळ शॉट खेळला जो इशांतच्या बोटाला लागला आणि नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी विकेटवर आदळला. यावेळी बेअरस्टो क्रीझबाहेर असल्याने तो धावबाद झाला. बेअरस्टो तीन चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. चार षटकांनंतर पंजाबची धावसंख्या दोन बाद 42 धावा अशी होती. त्यानंतर पंजाबला आणखी एक धक्का बसला अन् पंजाबची तिसरी विकेट गेली. प्रभसिमरन सिंग 26 धावांची इनिंग खेळून बाद झाला. पंजाब किंग्जने 10 षटकांत 87 धावा बोर्डावर लावल्या होत्या. पंजाबला विजयासाठी आणखी 10 षटकांत 88 धावांची गरज आहे. | PBKS vs DC
A win to start off ✅
Sam Curran & Liam Livingstone guide @PunjabKingsIPL to a 4️⃣ wicket victory over #DC
Scorecard ▶️ https://t.co/ZhjY0W03bC#TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/OrH2ZXUIID
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
सॅम करनचे दमदार अर्धशतक
सॅम करनने दिल्लीविरुद्ध आपल्या संघाचा डाव सावरत दमदार अर्धशतक झळकावले. करणने 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. लिविग्स्टनने देखील सॅमला मोलाची साथ दिली. | PBKS vs DC
12 बॉलमध्ये 10 रन्सची आवश्यकता असताना
शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये दहा रन्सची आवश्यकता असताना खलिलने एका पाठोपाठ एक अश्या दोन विकेट्स घेत सामन्यात आणखी चुरस निर्माण केली.खलिलला जोरात फटका मारण्याच्या नादात सॅम बोल्ड झाला. त्यानंतर मैदानात आलेला शशांक सिंह देखील एकही धाव न काढता तंबूत परतला आणि पंजाबला सहावा दणका बसला. तेव्हा 8 बॉल्समध्ये 8 रन्सची आवश्यकता होती.
अखेरच्या ओव्हरमध्ये हवे होते 6 रन्स
सॅमसोबत सेट झालेल्या लिविग्स्टनने अखेरच्या ओव्हरमध्ये दमदार खेळी कायम ठेवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.