PBKS vs DC : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतला. मात्र त्याला फार वेळ मैदानात टिकून खेळी करता आली नाही आणि तो लगेच तंबूत परतला. | PBKS vs DC
डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पंजाब किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला. 20 धावा करून मिचेल मार्श बाद झाल्यानंतर वॉर्नरही 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉर्नर बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत क्रीझवर आला. पंत १५ महिन्यांनंतर मैदानात परतत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी त्याचे मैदानात येताना जोरदार स्वागत केले.
त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला तिसरी झटका बसला. शाई होप 33 धावा करून बाद झाला. त्याचवेळी आहेत.टीमचा स्कोअर शंभरी पार होताच ऋषभ पंत देखील तंबूत परतला. | PBKS vs DC
दिल्ली कॅपिटल्सने 111 धावांवर चौथी विकेट गमावली. ऋषभ पंत 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. 13 ओव्हर्सनंतर दिल्लीने बोर्डावर 111 दहावा कव्वाल्या होत्या. | PBKS vs DC
अशी आहे प्लेयिंग इलेव्हन
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग. प्रभाव पर्याय: रिले रुसो, प्रभसिमरन सिंग, तान्या थियागराजन, हरप्रीत सिंग, विद्वत कविरप्पा. | PBKS vs DC
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा. प्रभाव पर्याय: अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, जेक फ्रेझर, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे