बारामती : राज्य शासनाच्या निर्देशानुसार बारामतीत दुकाने हॉटेल आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. बारामतीत एकाच दिवशी कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याने बारामती मधील दुकानांची वेळ पुन्हा दोन तासांनी कमी करुन सकाळी ९ ते सायंकाळी ५ करण्यात आली होती. आता राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार बारामतीमधील व्यवहार शुक्रवार( दि.१०) पासुन सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.
हॉटेल व्यवसायिकांना सायंकाळी सात वाजेपर्यंत हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवुन खाद्य पदार्थ देता येणार आहेत. व सायंकाळी सात ते दहा या वेळेत पार्सल देता येणार आहे.
बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली. बारामती व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची भेट घेतली. राज्य शासनाने या संदर्भात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.