Aadesh Bandekar Video| महाराष्ट्रातील एकूण १३ मतदारसंघात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून मुंबईतील अनेक सिनेकलाकार मतदानाचा हक्क बजावत आहेत.
मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनच बंद पडल्याच्या अथवा संथगतीने मतदान पार पडत असल्याच्या घटना समोर आल्या. असाच एक प्रकार पवईतील हिरानंदानी परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर घडला आहे. येथील ईव्हीएम मशिनच बंद पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
आदेश बांदेकर यांनी यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “मी आता पवई केंद्रावर आहे, हा हिरानंदानीसारखा सुशिक्षित परिसर आहे. हिरानंदानी फाऊंडेशन शाळेच्या ठिकाणी बऱ्याच मशीन बंद झाल्या आहेत. दोन-तीन तासांपासून मतदार रांगेत उभे आहेत. सकाळपासून आम्ही उन्हात उभे आहोत. वयोवृद्ध तर माघारी परतलेत. पण यावर कोणीही अधिकारी नीट उत्तरं देत नाहीये.”
View this post on Instagram
यावेळी त्यांच्यासोबत केंद्रावर उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. शिवाय अनेक वयस्कर नागरिक या व्यवस्थेवर टीका करताना दिसत आहे. शिवाय अनेक वयस्कर नागरिक या व्यवस्थेवर टीका करताना दिसले. आदेश बांदेकर यांच्यासोबत व्हिडिओमध्ये त्यांचा मुलगा सोहमही व्हिडिओमध्ये दिसत आहे. Aadesh Bandekar Video|
दरम्यान, आदेश बांदेकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया समोर दिल्या आहेत. ‘लोकशाही आणि संविधानाची विटंबना सुरु आहे’, ‘सगळा अंधाधुंदी कारभार आहे’, ‘भोंगळ कारभार’, अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. Aadesh Bandekar Video|
हेही वाचा:
देशात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान ; महाराष्ट्रात सर्वात कमी टक्केवारी