राष्ट्रीय महामार्ग आज सुरू होण्याची शक्यता
कराडहून सैदापूर, विटामार्गे सुविधा उपलब्ध
पुणे – पुराच्या तडाख्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शनिवारीही बंद होता. परंतु, बेळगाव, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबादकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कराडहून सैदापूर, विटामार्गे हा रस्ता सुरू करण्यात आला आहे. यामुळे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून हा मार्ग आज खुला होण्याची शक्यता आहे.
गुजरात, मुंबई, वाशी येथून चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, बेळगाव, कोल्हापूरकडे जाणारी मालवाहतूक ठप्प आहे. या वाहनांना किणी-वाठारपर्यंत प्रवेश दिला जात आहे. आठवडभरापासून बंद असल्याने महामार्गावर सुमारे एक लाख वाहने अडकून पडलेली आहेत. ही वाहने एकाच वेळी सोडल्यास महामार्ग “ब्लॉक’ होण्याची शक्यता आहे. यामुळे, या वाहनांना पर्यायी मार्ग शोधण्यात आला असून ही वाहने कराड शहराजवळून विटामार्गे बेळगावला सोडली जात आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कोल्हापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने तेथील सर्व्हे सुरू आहे. रविवारपर्यंत राष्ट्रीय महामार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. महामार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी विटामार्गे पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू कोंडी कमी होणार आहे.
– ज्योतिराम पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कराड शहर