नवी दिल्ली – भाजपने लोकसभेत ( lok sabha) महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेसला लक्ष्य केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule )यांनी त्या सभागृहात कॉंग्रेसची बाजू जोरदारपणे लावून धरली. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती कॉंग्रेसच्याच होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, महिला आरक्षण विधेयक (women’s reservation) त्या पक्षानेच मांडल्याची आठवण त्यांनी करून दिली.
अनेक वर्षे केंद्रात सत्तेत राहूनही कॉंग्रेसने महिला आरक्षणाच्या निश्चितीसाठी काय केले, असा सवाल भाजपचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेतील चर्चेवेळी केला. त्या प्रश्नाचे उत्तर सुप्रिया यांनी दिले. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान कॉंग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना मिळाला.
पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी त्याच पक्षाच्या होत्या. कॉंग्रेसच्याच मीरा कुमार लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती बनल्या. कॉंग्रेसनेच काही वर्षांपूर्वी महिला आरक्षण विधेयक मांडले. पण, पुरेसे संख्याबळ नसल्याने ते मंजूर होऊ शकले नाही, असे त्या म्हणाल्या.
#WATCH …मैं आज प्रधानमंत्री के भाषण की सराहना करती हूं जहां उन्होंने सराहना की कि शासन निरंतरता है। इस देश के निर्माण में पिछले 7 दशकों में विभिन्न लोगों ने योगदान दिया है, जिसे हम सभी समान रूप से प्यार करते हैं। चाहे आप इसे इंडिया कहें या भारत, यह आपका अपना देश है। हम सभी यहीं… pic.twitter.com/wGjCwjyfkH
— ANI_HindiNews (@AHindinews) September 18, 2023
पंचायतींमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळवून दिल्याबद्दल त्यांनी स्वत:चे वडील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रशंसा केली. महिलांना ते आरक्षण मिळवून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. आम्ही नंतर त्या आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवली, असे त्यांनी नमूद केले. सुप्रिया यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणीही केली.
केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना 2010 यावर्षी राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. मात्र, लोकसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे संबंधित विधेयक रद्दबातल ठरले.