Bollywood: अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपट सुपरहिट ठरत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीरसह बॉबी देओल, तृप्ती डीमरी, रश्मिका मंदाना या कलाकारांचे देखील खूप कौतुक होत आहे. ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी रश्मिकाच्या भूमिकेवर टीका केली होती. मात्र रणबीरसोबत या चित्रपटात रश्मिका नाही तर एका वेगळ्या बॉलीवूड अभिनेत्री घेणार होते.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Wanga) यांनी रणबीरच्या पत्नीची म्हणजे गीतांजलीच्या भूमिकेसाठी परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिला घेतलं होतं. परंतु काही कारणामुळे परिणीतीला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले. यावर आता संदीप रेड्डी वांगा यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “जमलं तर मला माफ करा. खरंतर तो माझाच दोष आहे. मी दीड वर्षांपूर्वी परिणीतीला कास्ट केले होते, पण काही कारणांमुळे मी परिणीतीमध्ये गीतांजली दिसली नाही.’
पुढे ते म्हणाले, “काही पात्रे काही कलाकारांना शोभत नाहीत. मी ऑडिशनवर कधीच विश्वास ठेवत नाही. मला तिचा अभिनय पहिल्या दिवसापासूनच आवडतो. मला तिला कबीर सिंगमध्ये कियाराच्या जागी तिला कास्ट करायचे होते, पण तसे झाले नाही. मी यासाठी परिणीतीचीही माफी मागितली. मला तिच्याबरोबर काम करायची प्रचंड इच्छा आहे आणि तिलाही ते माहीत आहे’.
मध्यंतरी परिणीतीनेही ‘या गोष्टी आयुष्यात होत असतात, आपण आपलं काम करायचं”असे विधान केले होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 60 कोटींहून अधिक कमाई केली असून, कमाईच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अॅनिमलने शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.