नवी दिल्ली – टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत इतिहास घडवला. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदक पटकावल्यावर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टोकियोत झालेल्या मूळ ऑलिम्पिकमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना मोटार भेट देणारे उद्योगपती आनंद महिंद्रा पॅरालिम्पिकपटूंसाठीही अशीच भेट देणार आहेत.
त्यात अवनी व सुमीत अंतील यांना खास मोटार भेट मिळणार आहे. त्यांचे व्यंग लक्षात घेत त्यानुसार तयार करण्यात आलेल्या या मोटारींचे वितरण हे खेळाडू भारतात परतल्यावर करण्यात येणार आहे.
खास रचनेनुसार तयार करण्यात येत असलेल्या या मोटारी सर्वसामान्य नसून खास सुविधांनी सज्ज असतील.