मुंबई – पराग मराठे या भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे अमेरिका क्रिकेट संघटनेचे संचालकपद कायम ठेवण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाल पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी मराठे यांनीच अमेरिका संघटनेचे अध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे लिड्स युनायटेड फुटबॉल क्लबचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यावेळी कामाचा व्याप वाढला असून दोन्हीकडे एकाच वेळी लक्ष देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
तसेच जर या दोन्ही पदांवर राहिलो तर दोन्ही जबाबदारी सांभाळणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, तरीही क्रिकेट संघटनेतील त्यांचा कार्यकाळ नुकत्याच झालेल्या बैठकीत वाढवण्यात आला आहे.