आळंदी – सेवाभावी उद्योजक पुरस्काराने प्रसिद्ध उद्योगपती तथा हॉटेल आराधनाचे मालक प्रकाश पानसरे, सरस्वती पानसरे तसेच पवार मिसळचे मालक पांडुरंग पवार यांना गौरवण्यात आले. तसेच पत्रकार दिनानिमित्त आळंदी परिसरातील पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण इंद्रायणी सेवा फाऊंडेशन आणि यशवंती संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी डी. डी. भोसले, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, कृष्णराव परेराव, यशवंती संस्थेचे अध्यक्ष राजेश दिवटे, इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सचिव दिनेश कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, संग्राम भंडारे, ज्ञानेश्वर महाराज करंदीकर, राजू हिवरे, नाजिम शेख, रामभाऊ जगताप, निलेश बोरचटे, बाळासाहेब पानसरे, भूषण बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. महादेव पाखरे, अर्जुन मेदनकर, भानुदास पऱ्हाड कारंडे, राजेंद सगर, अनिल जोगदंड, हमीद शेख, लक्ष्मण लटपटे, गौतम पाटोळे, अरिफ शेख, संदीप शिंदे, हनुमान घोंगडे, संदीप रंधवे, सुलतान शेख आदी पत्रकारांना गौरवण्यात आले.