मुंबई – पंकजा मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचं नाव आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी मराठी शो बस बाईमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तरांची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच पंकजा मुंडे यांनी अक्षय कुमारच्या रक्षाबंधनं या चित्रपटाचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधन चित्रपट पाहिल्यानंतर त्याबाबतचा आपला ट्विटरद्वारे अनुभव शेअर केला आहे. आज रक्षा बंधन मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत ?”रक्षा बंधन”सिनेमा पाहीला.मला खूप भावला.समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत कारण त्यांची किम्मत मोजावी लागते.fridge,TV,गाड़ी,status या गोष्टींसाठी आपल्या लाडकी चे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे अशी हळहळ व्यक्त करणारे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
आज रक्षा बंधन मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत ?”रक्षा बंधन”सिनेमा पाहीला.मला खूप भावला.समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत कारण त्यांची किम्मत मोजावी लागते.fridge,TV,गाड़ी,status या गोष्टींसाठी आपल्या लाडकी चे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 11, 2022
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणतात,”मला वाटते #RakshaBandhan सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे.कठीणआहे,आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो.नाते फायदा-तोटा यात बसवत असतो.जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा,काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची ! good movie great message” असे लिहीत पंकजा मुंडे यांनी अक्षय कुमारचे अभिनंदन करत त्याला टॅग देखील केले आहे.
मला वाटते #RakshaBandhan सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे.कठीणआहे,आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो.नाते फायदा-तोटा यात बसवत असतो.जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा,काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची !good movie great message @akshaykumar sir
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 11, 2022
राजकारणाव्यतिरिक्त पंकजा मुंडे यांचा हा अंदाज या आधी देखील पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी पंकजाताई बस बाई बस या मराठी शोमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी जबरदस्त धमाल करत अनेक प्रश्नाची सडेतोड उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले होते.