मुंबई – खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या निर्भीड वक्तव्यांसाठी आणि हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. असं असलं तरी उदयनराजे अनेकदा आपल्या कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून भाऊक देखील होतात. नुकतंच उदयनराजेंचा गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजेंनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. संघर्षयोद्धा या हॅशटॅगमध्ये हा व्हिडीओ पोस्ट करत उदयनराजेंनी लिहिले,”अद्वितीय आधारस्तंभ आदरणीय मुंडे साहेबांच्या आठवणी आजही डोळ्यात पाणी आणतात. त्यांच्या नसण्याची जाणिव आजही तीव्रतेने भासते”. तसेच मुंडेंच्या फोटोचे दर्शन घेताना उदयनराजे चांगलेच भावून झाल्याचे दिसून येतात.
आज दिवसभर हा video अनेकांनी पाठवला.. व्यक्त ही झाले बरेच.. काय बोलावे आमचे भाऊ उदयनराजे निष्पाप मनाचे धनी.. मुंडे साहेबांचे नाव स्मृती मध्ये राहीलच! 40 वर्ष खस्ता खाल्ल्या, 4 दिवसात आम्ही पद घेऊ पण ती जागा घेऊ कशी ? राजेंचे अश्रू निव्वळ निष्पाप प्रेम आहे.. https://t.co/rY5xcc4zi7
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 23, 2022
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी लिहिले,”आज दिवसभर हा video अनेकांनी पाठवला.. व्यक्त ही झाले बरेच.. काय बोलावे आमचे भाऊ उदयनराजे निष्पाप मनाचे धनी.. मुंडे साहेबांचे नाव स्मृती मध्ये राहीलच ! 40 वर्ष खस्ता खाल्ल्या, 4 दिवसात आम्ही पद घेऊ पण ती जागा घेऊ कशी ? राजेंचे अश्रू निव्वळ निष्पाप प्रेम आहे..”