मुंबई – भाजप नेता आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनाही करोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. यावेळी ओमायक्राॅन संसर्गाची बाधा झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम येथे एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी जोरात भूक लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.