नवी दिल्ली – कार निर्माती स्वीश कंपनी व्होल्वो आपल्या विविध उत्पादनांच्या किमती एक ते तीन लाख रुपयापर्यंत वाढविणार आहे. एक जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एकूणच माहागाई वाढल्यामुळे कार तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या अगोदरच बऱ्याच कार कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविल्या आहेत.
आता यामध्ये व्होल्वो कंपनी सामील झाली असल्याचे दिसून येते. रुपया घसरल्यामुळे कंपनीच्या आयात मालाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले.