‘पांघरूण’ पुन्हा एकदा विलक्षण प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : ‘काकस्पर्श’ आणि ‘नटसम्राट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज्‌ आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘पांघरूण’ हा चित्रपट येत्या मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ह्या चित्रपटातून गौरी इंगवले ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. झी स्टुडिओज्‌ आणि महेश मांजरेकर हे समीकरण मराठी प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही.

त्यांचे दिग्दर्शन असलेल्या काकस्पर्श, नटसम्राट अशा दर्जेदार कलाकृती झी ने प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचवल्या आणि आता पुन्हा एकदा झी स्टुडिओज्‌ आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘पांघरूण’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. ह्या चित्रपटाचा टीजर नुकताच झी स्टुडिओज्‌ च्या सोशल मीडिया अकाउंट्‌सवर प्रसिद्ध करण्यात आला. टीजर मध्ये ‘पुन्हा एकदा विलक्षण प्रेमकहाणी’ नमूद केले असल्याने प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता असेल ह्याच शंका नाही.

‘पांघरूण’ या सिनेमाच्या माध्यमातून अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातून जुना काळ उभा करण्यात येत आहे. हा सिनेमा 20 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या टीझरवरून उत्सुकता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.