पंजाब- श्री हिंदू तख्त, हिंदू सुरक्षा समिती आणि श्री पंचदशनाम जुना आखाडाचे प्रमुख पंचानंद गिरी महाराज यांचे गुरुवारी सकाळी मोहालीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या अनुयायांमध्ये शोकाचे वातावरण आहे.
पंचानंद गिरी महाराज यांचे पार्थिव मॅक्स हॉस्पिटल मोहाली येथून ज्वाला जी मंदिर, बुरैल सेक्टर 45, चंदीगड येथे भाविकांच्या अंतिम दर्शनासाठी नेण्यात आले. त्यानंतर पार्थिव ढकोली जिरकपूर डेरा येथे नेण्यात आले, तेथे मोठ्या संख्येने भाविकांनी अंत्यदर्शन घेतले. पटियालाच्या विविध बाजारपेठांमध्येही रहिवाशांनी महाराजांच्या पार्थिवांना अखेरची श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
पंचानंद गिरी महाराज यांचे पार्थिव सध्या श्री काली माता मंदिर, पटियाला येथील श्री शिवशक्ती सेवा दल लंगर चॅरिटेबल ट्रस्टच्या लंगर भवनात भाविकांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे, जिथे लोक दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. त्याचबरोबर विविध आखाडांमधून संत, महंत, महामंडलेश्वर अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.
पंचानंद गिरी महाराज यांचा जन्म 29 जुलै 1971 रोजी पटियाला येथे झाला. वयाच्या 9 व्या वर्षापासून त्यांनी हिंदू सुरक्षा समितीचे तत्कालीन अध्यक्ष शेरे-ए-हिंद पवन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आपले जीवन हिंदू धर्मासाठी समर्पित केले. हळूहळू हिंदू सुरक्षा समितीचे अध्यक्ष झाले. यानंतर त्यांचे हिंदुत्वाप्रती असलेले समर्पण पाहून त्यांना जगातील सर्वात मोठ्या पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले आणि नंतर त्यांना जगद्गुरू ही पदवी देण्यात आली. तसेच शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्री हिंदू तख्तचे पीठाधीश्वर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.