जिल्ह्यातील दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पंचनामे सुरु

नगर – जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे तातडीने करण्यात येवून शासन दरबारी पाठविण्याचे आदेश आले असून त्यानुसार पंचनामे करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत साडेतीन लाख हेक्‍टर जमीनी पैकी जवळपास दिड लाख हेक्‍टरजमिनीचे पंचनामे पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे तर उर्वरित दोन लाख हेक्‍टर जमिनीचे पंचनामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषीविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात पंचनामे करण्यात आलेल्या गावांचा तपशील पुढील प्रमाणे, नगर तालुक्‍यातील 69 गावातील 996 शेतकऱ्यांची 1388.24 हेक्‍टर जमीनीचे पंचनामे पूर्ण झाले असून 4 हजार 910 शेतकऱ्यांच्या 3999.24 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे प्रगतीपथावर आहेत तर पाथर्डीतील 84 गावातील 5 हजार 130 शेतकऱ्यांची 4 हजार 796 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले असून 15 हजार 37 शेतकऱ्यांच्या 13 हजार 112 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे प्रगतीपथावर पारनेर 106 गावातील 2500 शेतकऱ्यांची 2 हजार 335 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तर 6 हजार 100 शेतकऱ्यांची 5856 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे प्रगतीपथावर आहे.

कर्जत तालुक्‍यातील 118 गावातील 2हजार 476 शेतकऱ्यांची 1865.65 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तर 5 हजार 404 शेतकऱ्याच्या 3563.81 जमिनीचे पंचनामे प्रागतिक आहे. श्रीगोंदा तालुक्‍यात 115 गावात 6650 शेतकऱ्यांचे 4585.88 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे झाले आहेत तर 16 हजार 478 शेतकऱ्यांच्या 11 हजार 945 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे लवकरच करण्यात येणार आहेत. तर जामखेड तालुक्‍यातील 87 गावातील 374 शेतकऱ्यांच्या 207.7 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे झाले असून 1387 शेतकऱ्यांचे 750.22 जमिनीचे पंचनामे प्रगतीपथावर आहेत. श्रीरामपूर तालुक्‍यातील 56 गावांतील2223 शेतकऱ्यांच्या 2545 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे झाले असून 11हजार 225 शेतकऱ्यांचे 8447 जमिनीचे पंचनामे लवकरच पूर्ण होणार आहेत, नेवासे तालुक्‍यातील 3860 शेतकऱ्यांचे 1774.82 हेक्‍टर जमिनीचे पचनामे झाले आहेत तर 13 हजार 426 शेतकऱ्यांच्या 10310.82 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे प्रगती पथावर आहेत.

शेवगाव 113 गावातील 2647 शेतकऱ्यांची 1991.14 हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तर 9 हजार 117 शेतकऱ्यांच्या 8168.14 हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे प्रगतीपथावर आहेत. राहुरी तालुक्‍यात 96 गावातील 3691 शेतकऱ्यांच्या 2839.96 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे झाले असून 12222 शेतकऱ्यांच्या 11381 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. संगमनेर तालुक्‍यातील 172 गावातील 1050 शेतकऱ्यांच्या 3374.87 हेक्‍टर शेतजमिनीचे पंचनामे झाले आहेत तर 17 हजार 575 शेतकऱ्यांच्या 15796.87 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे सुरू आहेत.

अकोले तालुक्‍यातील 191 गावातील 7 हजार 391 शेतकऱ्यांची 4023.68 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले असून 10873 शेतकऱ्यांच्या 5412.58 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कोपरगाव तालुक्‍यातील 79 गावातील 2487 शेतकऱ्याच्या 2098 हेकटर जमिनीचे आजपर्यंत पंचनामे झाले असून 31हजार 990 शेतकऱ्यांच्या 32880 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे सुरू आहेत. राहता तालुक्‍यातील 61 गावांतील 6562 शेतकऱ्यांच्या 7232 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले असून 16 हजार 354 शेतकऱ्यांचे 21 हजार 868 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. असे एकूण 14 तालुक्‍यातील 1474 गावातील 48 हजार 37 शेतकऱ्यांच्या 41057.94 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे झाले असून 1लाख 72 हजार 098 शेतकऱ्यांच्या 144490.68 हेक्‍टर जमिनीचे पंचनामे प्रगती पथावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.