कराची – ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसह चौरंगी क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पुन्हा एकदा बीसीसीआयला दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच प्रस्ताव पाकिस्तान मंडळाने दिला होता मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी तो फेटाळला होता.
आता लवकरच आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आशीयाई क्रिकेट समितीची बैठक होणार असून त्यात पुन्हा एकदा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू रमीज राजा यांनी सांगितले आहे.